Ad will apear here
Next
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून १०४ जणांना रोजगार

मुंबई : राज्य शासनाचा उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.


वरळी येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी परिसरातील सुमारे तीन हजार इच्छुकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. एकूण ६७ कंपन्यांची यासाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी ५० कंपन्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. एक हजार ३९४ मुलांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून मुलाखती दिल्या. त्यापैकी ७५५ जणांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली. त्यातील १०४ जणांना जागेवर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते निवड झालेल्या तरुण-तरुणींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

‘उद्योग विभाग राबवत असलेल्या या उपक्रमाला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असून, ही समाधानाची बाब आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. प्रत्येकाला नोकरी देणे हे आमचे कर्तव्य आहे,’ असे देसाई यांनी या वेळी सांगितले.

वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZWWCD
Similar Posts
मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ मुंबई : राज्यात गुंतवणूकीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या वर्षातील पहिली मोठी आर्थिक झेप घेत; राज्यातील पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेची घोषणा सहा जानेवारी रोजी केली. अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच, पंतप्रधानांच्या ‘मेक इन
‘एमआयडीसी’लाही सातवा वेतन आयोग लागू होणार मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एक जानेवारी २०१६पासून पूर्वलक्षी प्रभावाने याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
‘अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे’ ठाणे : सर्वोत्तम शिक्षण पद्धती, समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद याबाबीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रॅंड बनला आहे. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःचा विकास करताना
‘प्लेक्सकॉन्सिल’तर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा गौरव मुंबई : दी प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे (प्लेक्सकॉन्सिल) आर्थिक वर्ष २०१६ (२०१५-१६) आणि २०१७ या वर्षांसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निर्यातदारांचा ‘कौन्सिल पुरस्कारा’ने गौरव केला. नुकत्याच आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्राचे उद्योग आणि खाणमंत्री सुभाष देसाई आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language